YouTube चॅनेल कसा तयार करायचा आणि पैसे कसे कमवायचे? | Online Money Earning

नमस्कार मित्रांनो आपण या पोस्ट मध्ये YouTube या व्हिडिओ प्लॅटफॉर्म वर स्वतः चा चॅनेल कसा तयार करायचा आणि पैसे कसे कमावायचे? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.


YouTube चॅनेल बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवणार आहोत. याबद्दल फिक्स करणे गरजेचे आहे. कारण YouTube च्या पॉलिसी नुसार एका चॅनेल वर एकाच विषयाबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. तुम्ही आज टेकनॉलॉजि उद्या मोटिवेशन परवा कॉमेडी व्हिडिओ बनवून अपलोड करू शकतं नाही.यामुळे तुमचा युट्युब चॅनेल मोनिटायझ होणार नाही आणि तुम्ही पैसे कमवू शकणार नाही. यामुळे तुम्ही कोणत्या विषयावर युट्युब चॅनेल बनवू शकता हे आपण जाणून घेऊया.

1)YouTube चॅनेल कोणत्या Niche/ विषयावर बनवायचा?
मित्रांनो तुम्हाला कोणत्या गोष्टीची आवड आहे. तो एकच विषय पुढीलप्रमाणे दिलेल्या विषयांपैकी निवडा. 

1)जर तुम्हाला Technology बद्दल माहिती असेल तर त्यावर चॅनेल बनवा. टेक चॅनेल टॉप मध्ये असतात.

2)Educational जर तुम्हाला कोणता विषय शिकवायचा. असेल त्याविषयाबद्दल तुम्ही चॅनेल बनवू शकता. उदाहरण तुम्ही मराठीतून इंग्रजी शिकवू शकता, विज्ञान, इतिहास व इतर विषय शिकवू शकता. पण विषय एकच निवडा.

3)Motivation & Facts जर तुम्हाला प्रेरणादायी गोष्टी आणि रोचक तथ्यांबद्दल माहिती असेल तर त्याबद्दल चॅनेल बनवू शकता.

4)Vlogs जर तुम्हाला vlog बनवायची आवड असेल तर त्यावर चॅनेल बनवू शकता.

अशाप्रकारे अनेक ऑपशन आहेत जसे व्यवसाय, व्यायाम, कॉमेडी,  यापैकी एक विषय निवडा. 

2)YouTube चॅनेल चा सेटअप कसा करायचा?

युट्युब चॅनेल चं नाव छोट, सोपं आणि युनिक असलं पाहिजे. ज्यामुळे लवकर सर्च होऊ शकत, त्यानंतर तुमच्या चॅनेल चा लोगो आकर्षक आणि युट्युब चॅनेल च्या विषयाशी कनेक्ट असला पाहिजे.

युट्युब चॅनेल वर तुमचा बॅनर वर चॅनेल चं नाव आणि शॉर्ट माहिती असली पाहिजे. युट्युब चॅनेल च्या डेस्क्रिपशन मध्ये युट्युब चॅनेल कशाबद्दल आहे आणि त्यातून प्रेक्षकांना काय शिकायला भेटेल. याबद्दल माहिती असणे गरजेचं आहे.

3)कन्टेन्ट स्ट्रॅटेजि काय बनवायची?

मित्रांनो तुम्ही युट्युब चॅनेल सुरु केल्यानंतर तुमच्या साठी सर्वात चांगली स्ट्रेटेजी म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बनवणे. जर तुम्ही दररोज दोन शॉर्ट व्हिडिओ अपलोड करा.सुरुवातीच्या दिवसात शॉर्ट व्हिडिओ बनवण्यावर लक्ष द्या. तुम्ही व्हिडिओ 15 सेकंद ते 45 सेकंडपर्यंत बनवा. व्हिडिओ चा वर्टिकल शेप ठेवा, त्याची साईझ (9:16) पाहिजे. 

व्हिडिओ बनवत असताना सुरुवातीला एक सस्पेन्स क्रीअट करा. ज्यामुळे लोकांना व्हिडिओ पाहायची उत्सुकता वाटेल, त्यानंतर व्हिडिओ मध्ये चांगल्या प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ वापरा. जर तुम्ही चेहरा दाखवून व्हिडिओ बनवणार असेल. तर तुम्हाला कॉपीराईट चं टेन्शन राहणार नाही. कारण चेहरा न दाखवता तुम्हाला जास्तीत जास्त फोटो आणि व्हिडिओ चा वापर करावा लागेल. ते फोटो आणि व्हिडिओ वर कॉपीराईट येणार नाही. याची दक्षता घ्यावी लागेल.

4)SEO (Search Engine Optimization)

तुमचा व्हिडीओ सर्च मध्ये येण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ च्या टायटल मध्ये प्रश्न किंवा संभ्रम निर्माण करावे लागेल. उदाहरण ऑनलाईन पैसे कसे कमवायचे? 

व्हिडिओ बद्दल तुम्हाला डेस्क्रिपशन मध्ये काय आहे? याबद्दल सांगावे लागेल. ज्यामुळे तुमचा व्हिडिओ ची प्रोसेस हि चांगली आहे हे समजते.

व्हिडिओ च्या टायटल मध्ये हॅशटॅग चा वापर करा. ज्यामुळे त्या हॅशटॅग ला सर्च केल्यानंतर तुमचा व्हिडिओ सर्च मध्ये येईल. हॅशटॅग व्हिडिओ शी कनेक्टड असले पाहिजे. हॅशटॅग कमी असावे 3 किंवा 4 असावे. उदाहरण जर टेकनॉलॉजि चा व्हिडिओ असेल तर #techmarathi #technology 

5)YouTube चॅनेल ची ग्रोथ कशी करायची?

कंमेंट मध्ये pinned question टाका. Community tab चा वापर करा. तुम्ही ज्या विषयावर व्हिडिओ बनवणार त्याच्याशी रेलटेड व्हिडिओ पहा. कॉपी करू नका. त्यातून शिका आणि त्यात कोणत्या गोष्टी ऍड करता येतील. त्यावर लक्ष द्या आणि एक चांगला व्हिडिओ बनवा. 

जुने वायरल व्हिडिओ पहा, ते व्हिडिओ वायरल का झाले? त्याबद्दल जाणून घ्या. त्या विडिओ चा आधार घेऊन स्वतः असे कन्टेन्ट बनवा कि तुमचं पण कन्टेन्ट वायरल झालं पाहिजे. चुकीच्या गोष्टी करू नका.

6)Monetisation कसे करायचे? 

युट्युब चॅनेल बनवण्यामागचा सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पॉप्युलर होणे आणि त्यासोबत पैसे कमवणे. पैसे कमवण्यासाठी तुम्हाला चॅनेल मॉनिटाईझ करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला युट्युब चे नियम समजून घ्यावे लागतील. 

1) जर तुमच्या युट्युब चॅनेल वर 500 Subscriber आणि 90 दिवसात तुमच्या चॅनेलवर 3 व्हिडिओ असले पाहिजे.त्यासोबत 365 दिवसात 3000 तासाचा वॉच टाइम आणि 90 दिवसात 30 लाख शॉर्ट views असले पाहिजे.  त्यानंतर तुमचा चॅनेल monetise होऊ शकतो.

2)जर तुमच्या युट्युब चॅनेलवर 1000 Subscriber, 365 दिवसात 4000 तासाचा वॉच टाइम आणि 90 दिवसात 100 लाख views असले पाहिजे.

YouTube चॅनेल बनवल्यानंतर काही गोष्टी लक्षात ठेवा

1) युट्युब चॅनेल बनवल्यावर काही दिवसात तुम्ही पैसे कमवू शकतं नाही. त्यासाठी तुम्हाला पेशंन्स ठेवावे लागतील.

2) तुमच्या व्हिडिओ वर काही दिवसात खूप सारे views येणार नाही. काही ठराविक काळानंतर तुमचं कंटेन्ट पाहून views नक्की येणार.

3)दुसऱ्याचे व्हिडिओ चांगले चालत आहे म्हणून ते पूर्णपणे कॉपी करू नका. त्यातून शिका आणि स्वतःच कन्टेन्ट बनवा.

4)युट्युब वर सातत्य राखण गरजेचं आहे. सर्वाना लवकर यश भेटत नाही. 

5)एकदा का तुमचा कन्टेन्ट लोकांना आवडला कि तुम्ही पैसे कमवायला लागणार.

निष्कर्ष
युट्युबर बनणं म्हणजे फक्त नशिबाच काम नाही तर त्यामागे काही वर्षांचे कष्ट लागते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा नवीन गोष्टी शिका स्वतःच कन्टेन्ट चांगल बनवा. 

#YouTube #onlinemoney #earnmoney 










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.