ऑनलाईन पैसे कमवण्याचे 7 मार्ग | Online Money Earning

नमस्कार मित्रांनो आजच्या डिजिटल युगात घरबसल्या पैसे कमवणे शक्य झाले आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेट मुळे विध्यार्थी, गृहिणी, नौकरी करणारे लोकं सुद्धा पार्ट टाइम किंवा फुल टाइम ऑनलाईन कमाई करू शकतात.

जर तुम्हाला सुद्धा ऑनलाईन पैसे कसे कमवायचे? याबद्दल माहिती हवे असेल, तर हा लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचा.

1)ब्लॉगिंग(Blogger, Wordpress) करून पैसे कमवा 

तुम्हाला जर लेखनाची म्हणजेच टायपिंग ची आवड असेल तर Blogger किंवा Wordpress वर ब्लॉग सुरु करा. यासाठी तुम्ही कोणताही एक विषय निवडा. उदाहरण - फॅक्ट, टेकनॉलॉजि, न्यूज व इतर 

🤑कमाई कशी होते?

•Google Adscence - तुमच्या पोस्टवर ऍड दिसल्यावर पैसे भेटतात. त्यासाठी ब्लॉग मोनिटायझ करावा लागतो.

•Affiliate Marketing बद्दल मी संपूर्ण माहिती दिली आहे. या लिंकवर क्लीक करून पाहू शकता.

•Sponsored Post - कोणी व्यक्ती किंवा कंपनी तुमच्या पोस्ट साठी स्पॉन्सर करते. त्यामध्ये त्यांच प्रोमोशन करावे लागते.

सुरुवातीला 3 किंवा त्यापेक्षा जास्त महिने कष्ट करावे लागतात. 

2)YouTube Channel सुरु करा.

तुम्हाला व्हिडिओ बनवण्याची आवड असेल तर YouTube च्या माध्यमातून कोणत्याही एका विषयावर व्हिडिओस बनवू शकता.
उदाहरण - शिक्षण, फॅक्टस, टेकनॉलॉजि, फिटनेस व इतर 

🤑कमाई करण्याचे मार्ग 

•Google  Adscence 

•Brand Promotion 

•Affiliate Marketing Link 

Short Video आणि long video दोन्ही बनवू शकता.

3)Freelancing 

जर तुम्हाला लेखन, ग्राफिक डिजाईन, व्हिडिओ एडिटिंग, लोगो एडिटिंग, भाषांतर येत असेल तर तुम्ही फ्रीलाँसिन्ग करु शकता. 

लोकप्रिय प्लॅटफॉर्म 

•Fiverr 

•Upwork 

•Freelancer 

4) Content/ Script Writing 

 वेबसाईट साठी आर्टिकल लिहून पैसे मिळतात. त्यासोबत जर तुम्ही व्हिडिओ क्रियटर साठी स्क्रिप्ट लिहून देऊ शकता. त्यामधून तुम्ही पैसे कमवू शकता.

5)स्टॉक मार्केटिंग / ट्रेडिंग 

तुम्ही वाचलं किंवा ऐकलं असेल कि काही लोग शेअर मार्केट मधून पैसे कमवून श्रीमंत झाले आहेत. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून कमाई करता येते. पण यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. 

कारण शेअर मार्केट मधून लोग लखपती किंवा करोडपती झाले आहेत. पण त्यासोबत गरीब पण झाले आहेत. त्यामुळे शेअर मार्केट एक रिस्क आहे. त्याबद्दल चांगली माहिती करून गुंतवणूक करा.

तुम्हाला शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची असेल त्यासाठी तुमचं अकाउंट असायला हवं. त्यासाठी 

•Groww 

•Zerodha 

•Upstox

या ऍप वर तुम्ही अकाउंट बनवू शकता.

6)फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेज 

फेसबुक किंवा इंस्टाग्राम वर पेज बनवून त्यावर फोटो, व्हिडिओ (रील्स ) पोस्ट करून तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्राम वर पैसे कमवू शकता. त्यासोबत ब्रँड प्रोमोशन करून पण पैसे कमवू शकता.

7) Educational App 

तुम्हाला कोणताही विषय शिकवायला आवडत असेल तर तुम्ही त्यासाठी तुमचं स्वतःच एक educational app बनवून जाहिराती आणि सब्स्क्रिपशन द्वारे पैसे कमवू शकता. 

निष्कर्ष 

ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी तुमच्या मध्ये सर्वप्रथम कोणताही अंधविश्वास नसायला हवा कि मी आज सुरु करेल आणि उद्या पासून पैसे कमवायला सुरुवात करेल. 

ऑनलाईन पैसे कमवता येते पण त्यासाठी तुमच्या मध्ये संयम असायला हवा त्यासोबत काम करण्याच सातत्य, आणि कौशल्य असायला हवे. 

लवकर पैसे कमवण्याच्या नादात ना स्वतःला फसवून घ्या ना दुसऱ्यांना फसवा.

धन्यवाद 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.