नमस्कार मित्रांनो Affiliate marketing ऑनलाईन पैसे कमवण्याचा सगळ्यात चांगला पर्याय आहे. याद्वारे तुम्ही हजारो लाखों रुपये घरी बसल्या कमवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला Affiliate Marketing कशी करायची? याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.
जर तुम्हाला Affiliate Marketing बद्दल शिकायचं असेल तर तुम्हाला हि पोस्ट पूर्ण वाचून नीट समजून घ्यावी लागेल. तुम्हाला या पोस्ट मध्ये Affiliate Marketing म्हणजे काय? Affiliate Marketing काम कशी करते? Affiliate Marketing कसे करावे? Affiliate Marketing चे फायदे आणि तोटे काय आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर पद्धतीने सांगण्यात आली आहेत. तर चला जाणून घेऊया
Table of Contents
1)Affiliate Marketing म्हणजे काय असते?
Affiliate Marketing एक अशी मार्केटिंग टेकनि्क आहे, ज्यामध्ये एक affiliate वेगळंया कंपनीचा प्रॉडक्ट आपल्या मार्केटिंग स्किल ने विकतो. त्याच्या या कामासाठी त्याला त्या प्रॉडक्ट चे कमिशन भेटते.
Affiliate सोप्या पद्धतीने affiliate प्रोग्राम जॉईन करून कोणत्याही प्रॉडक्ट ला ऑनलाईन ब्लॉगर, युट्युब आणि wordpress द्वारे प्रॉडक्ट ची लिंक देतो. त्या लिंकद्वारे कोणताही ग्राहक ती वस्तू विकत घेतो. तेव्हा त्या वस्तूचे कमिशन त्या affiliate करणाऱ्या व्यक्तीला भेटते. कमिशन वस्तू कोणती आहे त्यावर निर्भर असते.
2)Affiliate Marketing काम कशी करते?
Affiliate Marketing चार स्टेप्स मध्ये काम करते. पहिला प्रॉडक्ट निर्माता कंपनी, दुसरा Affiliate प्लॅटफॉर्म, तिसरा Affiliate आणि चौथा ग्राहक.
प्रॉडक्ट निर्माता कंपनी स्वतःचा प्रॉडक्ट बनवून मार्केट मध्ये ऑनलाईन विकायला Affiliate प्लॅटफॉर्म ला निवडते. Affiliate प्लॅटफॉर्म वरील वस्तुंना लोकांपर्यंत सहज रित्या पोहचवण्यासाठी Affiliate ब्लॉगर, वर्डप्रेस, युट्युब आणि अन्य कोणत्याही सोशल मीडिया द्वारे प्रॉडक्ट बद्दल मार्केटिंग करून प्रॉडक्ट च्या लिंकद्वारे जेव्हा ग्राहक तो प्रॉडक्ट विकत घेतो. तेव्हा प्रॉडक्ट चं कमिशन Affiliate करणाऱ्या व्यक्तीला भेटते. त्या प्रॉडक्ट चं कमिशन त्या प्रॉडक्ट वर अवलंबून असते. त्या कमिशन मधील रक्कम ऑनलाईन द्वारे affiliate प्लॅटफॉर्म affiliate करणाऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात पाठवते.
3)Affiliate Marketing बद्दल महत्वाच्या गोष्टी
Affiliate Marketing जेव्हा तुम्ही सुरु कराल, तेव्हा तुम्हाला काही गोष्टी माहित असणे गरजेचं आहे. जसे Affiliate म्हणजे असा व्यक्ती जो Affiliate Program वर स्वतःच अकाउंट बनवून वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रॉडक्ट प्रमोट करतो आणि त्याचे त्याला कमिशन मिळते. Vendor म्हणजे प्रॉडक्ट बनवणारी कंपनी.
Affiliate Platform म्हणजे ऐसा ऑनलाईन मार्केट जिथे Affiliate आणि vendor दोन्ही असतात. उदाहरण म्हणजे ऍमेझॉन चं शॉपिंग ऍप.
Affiliate ID म्हणजे Affiliate Platform वर जेव्हा तुम्ही अकाउंट बनवता तेव्हा तुम्हाला एक युनिक आयडी दिली जाते. त्याला ऍफिलिट आयडी म्हणतात. ज्याचा वापर करून तुम्ही कोणत्याही प्रॉडक्ट ला सेल करू शकता.
Affiliate Link म्हणजे प्रॉडक्ट ची युनिक लिंक ज्याद्वारे ऍफिलिट प्रॉडक्ट प्रोमोट करू शकतो.
Commision म्हणजे जेव्हा कोणताही ऍफिलिट प्रॉडक्ट लिंक द्वारे मार्केटिंग करून ऑनलाईन विकतो. तेव्हा त्या प्रॉडक्ट च्या किमतीत काही टक्के पैसे त्या ऍफिलिट ला भेटते. त्याला कमिशन म्हणतात.
Affiliate Marketing ची सुरुवात कशी करायची?
Affiliate Marketing करण्यासाठी तुम्हाला त्याच्या स्टेप्स काय आहेत? याबद्दल माहित असणे गरजेचे आहे. तर चला जाणून घेऊया
1)तुमचं Niche(विषय) काय आहे?
तुम्हाला कोणताही व्यवसाय करायचा असेल तर तो कोणता करायचा? हा सर्वात मोठा मुद्दा असतो. तसेच ऍफिलिट मार्केटिंग मध्ये पण एक niche निवडायचं असतं ज्यावर तुम्हाला काम करायच असते.niche वर काम करूनच तुम्ही यशस्वी होऊ शकता.
Niche चे प्रकार
a)Technology (तंत्रज्ञान) - टेकनॉलॉजि मध्ये तुम्ही टेक गोष्टींबद्दल माहिती देऊन त्या प्रॉडक्ट ची लिंक देऊन तुम्ही विकू शकता.
b)Education(शिक्षण) - तुम्हाला शैक्षणिक गोष्टींबद्दल आवड असेल तर त्याबद्दल माहिती देऊन शैक्षणिक वस्तू जसे पुस्तकं, वही, पेन आणि पेन्सिल व इतर प्रॉडक्ट च्या लिंक देऊन तुम्ही त्याची मार्केटिंग करू शकता.
c)Lifestyle ( जीवनशैली) - तुम्हाला जर जीवनशैली कशी ठेवायची? म्हणजे कपडे कोणते व कधी घालायचे. बूट किंवा स्लीपर कोणती वापरायची. याबद्दल माहिती देऊन तुम्ही त्याची मार्केटिंग करू शकता.
d)मेकअप - मुलींचा आवडता विषय म्हणजे मेकअप विषयीं माहिती व मेकअप चं साहित्य. जर कोणत्या मुलीला ऍफिलिट मार्केटिंग करायची असेल तर तिच्यासाठी हा विषय सर्वात महत्वाचा होईल.
बाकी पण खुप ऑपशन आहेत. पण हे सर्वात मोठे ऑपशन आहेत.
2)ऍफिलिट प्लॅटफॉर्म जॉईन कसा करायचा?
तुमच्या niche वर काम करण्यासाठी तुम्हाला कोणता तरी ऍफिलिट प्लॅटफॉर्म जॉईन करावा लागेल.
तुम्ही पोस्ट सुरुवातीपासून वाचली असेल तर तुम्हाला ऍफिलिट प्लॅटफॉर्म काय आहे? याविषयीं माहिती झाले असेल. तर तो कसा जॉईन करायचा? हा सर्वात मोठा प्रश्न पडतो. तर चला जाणून घेऊया.
ऍफिलिट प्लॅटफॉर्म कोणते आहेत? याविषयीं जाणून घेणे गरजेचे आहे.
1)Amazon Associate
2)Clickbank
3) Warrior Plus
4)Digistore 24
5)Share a sale
6)JVZoo
7)Commision Junction
या पलीकडे पण इतर ऍफिलिट प्लॅटफॉर्म आहेत.
यापैकी कोणताही ऍफिलिट प्लॅटफॉर्म तुम्ही जॉईन करू शकता. आपल्या भारत देशात Amazon चा ऍफिलिट प्लॅटफॉर्म जास्त फेमस आहे.
ऍफिलिट प्रॉडक्ट चे प्रकार
ऍफिलिट प्रॉडक्ट निवडन्याआधी तुम्हाला ऍफिलिट प्रॉडक्ट चे प्रकार माहित असणे गरजेचे आहेत.
1)Low Ticket Product म्हणजे ज्या प्रॉडक्ट मध्ये कमी कमिशन असते. याप्रकारचे प्रॉडक्ट तुम्ही कमी कमिशन कमवू शकता. पण जर तुम्ही जास्तीत जास्त प्रॉडक्ट विकले तर कमी कमिशन पण जास्त होऊ शकते.
कमी कमिशन चे प्रॉडक्ट विकण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त कस्टमर भेटू शकतात. ज्यामुळे तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही.
2)High Ticket Product म्हणजे ज्या प्रॉडक्ट मध्ये जास्त कमिशन भेटते. पण याप्रकारचे प्रॉडक्ट विकणे सोपं नाही कारण कोणीही तुम्हाला सोप्या प्रकारे जास्त पैसे देणार नाहीत. जर त्या प्रॉडक्ट चा फायदा कंपनी आणि ऍफिलिट प्लॅटफॉर्म ला जास्त होतं असेल तेव्हा तुम्हाला जास्त कमिशन भेटेल.
जास्त फायदा कमवण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजि वापरावी लागेल. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकाव्या लागतील.
प्रोमोशन साठी प्लॅटफॉर्म कोणते वापरायचे?
ऍफिलिट प्लॅटफॉर्म वर अकाउंट बनवल्यानंतर तुम्हाला ते प्रॉडक्ट प्रोमोट करण्यासाठी कोणता तरी प्लॅटफॉर्म असणे गरजेचे आहे. ज्या प्लॅटफॉर्म द्वारे तुम्ही लोकांशी कनेक्ट होऊ शकता. त्याद्वारे त्यांना तुम्ही प्रॉडक्ट ची लिंक देऊन प्रॉडक्ट विकू शकता. यासाठी खाली काही प्रसिद्ध प्लॅटफॉर्म दिलेले आहेत. चला जाणून घेऊया
1)Blogger / Wordpress
ब्लॉगर किंवा वर्डप्रेस वर तुम्ही स्वतःचा ब्लॉग बनवू शकता. जर तुम्ही ब्लॉगर वर ब्लॉग बनवला तर तेथे तुम्हाला फक्त डोमेन खरीदी करावा लागेल आणि जर तुम्ही वर्डप्रेस वर ब्लॉग बनवला तर डोमेन आणि हॉस्टिंग खरेदी करावी लागेल. कारण तुमच्या युनिक डोमेन मुळे तुमचा ब्लॉग लवकर सर्च मध्ये येईल.
तुम्हाला ब्लॉग वर प्रॉडक्ट ची माहिती जसा प्रॉडक्ट कसा आहे. त्याचा वापर, त्याची गरज याबद्दल माहिती देऊन तुम्ही सगळ्यात खाली प्रॉडक्ट ची लिंक देऊन तो विकू शकता.
2)YouTube
युट्युब वर तुम्ही स्वतःचा चॅनेल बनवून व्हिडिओ च्या माध्यमातून ऍफिलिट मार्केटिंग करू शकता. तुम्हाला व्हिडिओ मध्ये त्या प्रॉडक्ट ची माहिती सांगायची आहे. त्या प्रॉडक्ट ची ऍफिलिट लिंक तुम्हाला व्हिडिओ च्या डेस्क्रिपशन मध्ये द्यायची आहे.
3)सोशल मीडिया (फेसबुक किंवा इंस्टाग्राम)
फेसबुक किंवा इंस्टाग्राम वर तुम्ही स्वतःच पेज बनवू शकता. त्यावर प्रॉडक्ट पोस्ट किंवा व्हिडिओ द्वारे प्रोमोट करू शकता. आजच्या काळात इंस्टाग्राम वर तुम्ही पाहू शकता कि लोकं ऍफिलिट मार्केटिंग करून पैसे कमवत आहेत.
ट्रॅफिक कशी आणायची?
ब्लॉग, चॅनेल आणि पेज वर ट्रॅफिक कशी आणायची. सर्वात मोठा पर्याय म्हणजे ऑरगॅनिक ट्रॅफिक. ऑरगॅनिक ट्रॅफिक मध्ये तुम्हाला कोणते पैसे नाही देयाचे तुम्हाला सर्च इंजिन आणि सोशल मीडिया वरून ट्रॅफिक जमा करायच आहे.
या ऑरगॅनिक ट्रॅफिक चा सर्वात मोठा फायदा असा कि एकदा तुमच्या ब्लॉग, पेज आणि युट्युब वर ट्रॅफिक आले तर ते तुमच्या साठी कायम स्वरूपी राहणार आहे. जर तुम्ही चांगल्या प्रकारे मार्केटिंग केली तर.
ट्रॅफिक आणण्यासाठी काही गोष्टी खालीलप्रमाणे
1)SEO (Search Engine Optimization)
2)Keyword research
3)daily content sharing
4)Quality content वर काम करा.
Paid Traffic - तुम्ही जर पैसे खर्च करणार असेल तर तुमच्या साठी सोशल मीडिया पेड प्रोमोशन ठेवते. त्याद्वारे तुम्ही पैसे खर्च करून ट्रॅफिक घेऊन येऊ शकता.
ऍफिलिट मार्केटिंग वर पैसे कसे कमवायचे?
ऍफिलिट मार्केटिंग वर पैसे कमवणे अगदी सोपं नाही ना अशक्य आहे . त्यासाठी तुम्हाला सतत प्रयत्न करावे लागेल. त्या प्रयत्नानंतर तुम्हाला हळुहळू यश नक्की भेटेल. त्यासाठी तुम्हाला प्रॉडक्ट ची मार्केटिंग कशी करायची याबद्दल चांगल्या प्रकारे शिकावे लागेल.
तुम्ही चांगल्या प्रकारे मार्केटिंग करू शकला तर कस्टमर येतील व लिंक द्वारे प्रॉडक्ट खरेदी करतील त्यानंतर तुम्हाला कमिशन भेटेल.
त्यासाठी तुम्हाला कस्टमर ला त्यांचा फायदा या प्रॉडक्ट मधून कसा होईल? हा विश्वास द्वावा लागेल. यामुळे कस्टमर चा पण फायदा आणि तुमचा पण फायदा.
ऍफिलिट मार्केटिंग चे फायदे
ऍफिलिट मार्केटिंग करण्याचे खूप सारे फायदे आहेत. त्यापैकी काही खालील प्रमाणे
1) ऍफिलिट मार्केटिंग तुम्ही घरी बसून करू शकता. सोप्या भाषेत घर बसल्या काम
2)ऍफिलिट मार्केटिंग तुम्ही मोबाईल द्वारे करू शकता पण जर चांगल्या प्रकारे करायची असेल तर लॅपटॉप किंवा कॉम्पुटर गरजेचं आहे.
3)तुम्ही जर चांगल्या प्रकारे ऍफिलिट मार्केटिंग केली तर तुम्हाला जॉब करायची गरज पडणार नाही.
4)ऍफिलिट मार्केटिंग तुम्ही 24 तासात कधी पण करू शकता त्याला वेळेचे बंधन नाही.
5)तुम्हाला मार्केटिंग स्किल्स जमल्यावर तुम्ही कोणत्याही कंपनी चा प्रॉडक्ट विकू शकता.
Affiliate Marketing चे तोटे
1)तुम्ही स्वतः कोणत्याही प्रॉडक्ट साठी जास्त डिस्काउंट देऊ शकतं नाही.
2)जर तुम्ही पेड प्रोमोशन चा वापर करत असाल तर त्यातून जर ग्राहक नाही आले तर तुमचे पैसे वाया जाऊ शकतात.
3)तुम्हाला प्रॉडक्ट चं प्रोमोशन करत असताना जे नियम व अटी घालून दिल्या आहे त्यांचं पालन करावे लागेल. अन्यथा तुमच्यावर कारवाई होऊन तुमचं ऍफिलिट अकाउंट बंद होऊ शकतं.
4)ऍफिलिट मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला सातत्याने कष्ट करावे लागतील. तेव्हा कुठे तुम्हाला हळू हळू यश भेटेल.
निष्कर्ष
या ब्लॉगपोस्ट मध्ये तुम्हाला मी ऍफिलिट मार्केटिंग बद्दल प्रत्येक गोष्ट अगदी सोप्या भाषेत सांगितली आहे. ज्याचा वापर तुम्हाला ऍफिलिट मार्केटिंग करताना नक्की होणार.
मी पूर्ण प्रयत्न केला आहे कि तुम्हाला ऍफिलिट मार्केटिंग बद्दल चांगली माहिती भेटेल. तरी पण माझ्याकडून काही राहून गेलं असेल तर कंमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.
धन्यवाद
#affiliatemarketing #onlinemoneyearn #moneyearning