नमस्कार मित्रांनो आज आपण किल स्विच फिचर बद्दल जाणून घेणार आहोत. ते काय आहे आणि त्याचा वापर काय होणार? चला जाणून घेऊया
किल स्विच फिचर म्हणजे काय?
सध्याच्या काळात ऑनलाईन पैसे व्यवहारात खूप फ्रॉड होतं आहे. त्याला थांबवण्यासाठी किल स्विच फिचर भारत सरकार येणाऱ्या काळात घेऊन येऊ शकतं. किल स्विच हा एक आपत्कालीन बटन आहे.
जो ऑनलाईन पैसे व्यवहार लवकर थांबवण्यासाठी ऑपशन देते.याचा मुख्य उपयोग सायबर चोरी आणि विशेषतः डिजिटल अरेस्ट नावाच्या फसवणूकींना रोखण्यासाठी केला जाणार आहे.UPI च्या कोणत्याही ऍप वर किल स्विच नावाचे बटन असणार आहे.ज्यावर टॅप करताच ऑनलाईन पैसे व्यवहार लगेच थांबवले जातील. यामुळे तुम्ही कोणत्याही फ्रॉड पासून वाचू शकता.
किल स्वीच चा उपयोग कसा होणार?
डिजिटल अरेस्ट म्हणजे फ्रॉड करणारे लोकं बँकेतून सतत पैसे काढण्यासाठी भाग पाडतात. व्हिडिओ कॉलद्वारे धमकी देतात आणि भीती निर्माण करतात.
किल स्विच अशावेळी UPI यूजर ला अशा प्रकारच्या होणाऱ्या फसवणूकींना थांबवण्यासाठी मदत करते. सर्व प्रकारचे ऑनलाईन पैसे व्यवहार बंद करते. ज्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित राहतात.
भारत सरकारचा किल स्विच वर निर्णय काय आहे?
भारत सरकार ने यावर कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. यावर संसदेत कोणताही कायदा बनवला गेला नाही.
केंद्र सरकारच्या गृह मंत्रालय आणि एक उच्च स्तरीय समिती स्थापन करून बँकिंग क्षेत्रात आणि UPI ऍप्स मध्ये किल स्विच फिचर आणण्यांचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावावर तज्ञ, बँक आणि मुख्यता RBI यावर तांत्रिक स्वरूपात आणि कधी लागू होऊ शकतो हे तपासात आहे.
भारत सरकार ने बँकिंग क्षेत्रात कोणतेही बदल केलेले नाही. किल स्वीचं वर सध्या विचार चालू आहे पण अधिकृतपणे कोणताही निर्णय घेतलेला नाही.
निष्कर्ष
किल स्विच फिचर लागू झाले तर ऑनलाईन पैसे व्यवहार करणाऱ्यांसाठी जास्त सुरक्षा भेटेल. किल स्विच कधी लागू होणार? हे सांगणे कठीण आहे.
#killswitchfeature #techmarathi #technology #news